३१ मार्चपर्यंत बंद...........\
मंबई: करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने गर्दी रोखण्यासाठी अखेर रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारहीमार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.जनता कफ्र्यु असल्याने आज मुंबईतीललोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. केवळ ६० टक्केच लोकल आज धावत आहेत.ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंतच असेल. रात्री १२ नंतर लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल.३१ मार्चपर्यंतही सेवा स्थगित राहील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईप्रमाणे कोलकातामधील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे.